Ad will apear here
Next
राजा केळकर संग्रहालय बघा नव्या नजरेने! चार ऑगस्टला हेरिटेज वॉक
पुणे : संग्रहालय बघण्याचेही एक तंत्र असते; पण सगळ्यांनाच ते माहीत नसते. त्यामुळे सर्वसामान्य लोकांसाठी संग्रहालय बघणे ही गोष्ट फारशी उत्कंठावर्धक नसते. संग्रहालय पाहण्याचा अनुभव रोचक करण्याच्या उद्देशाने आशुतोष पोतनीस आणि अश्विन चितळे यांनी संग्रहालयाच्या हेरिटेज वॉकची सुरुवात केली आहे. 

पुण्यातील राजा केळकर संग्रहालयाच्या हेरिटेज वॉकपासून याची सुरुवात होणार आहे. येत्या रविवारी, चार ऑगस्ट रोजी संध्याकाळी चार वाजता या हेरिटेज वॉकची सुरुवात होणार आहे. यासाठी ऐच्छिक शुल्क असून, इच्छुकांनी ठरलेल्या वेळेत राजा केळकर संग्रहालयाजवळ जमायचे आहे.   
 
पेशवेकालीन इतिहास आणि प्राचीन ऐतिहासिक वारशासाठी प्रसिद्ध असलेले हे संग्रहालय अनेकांनी अनेकदा पाहिले असेल; पण तेथील प्रत्येक गोष्टीचा इतिहास उलगडत ते पाहण्याचा अनुभव निश्चितच अनोखा ठरणार आहे. पुरातत्त्वशास्त्रातील पदव्युत्तर शिक्षण घेतलेले अश्विन चितळे गेल्या दोन- डीच वर्षांपासून ऐतिहासिक स्थळांच्या सहलींचे आयोजन करत आहेत, तर पेशवेकालीन इतिहासात रमणारे आशुतोष पोतनीस त्यांना सहकार्य करत आहेत. इतिहासाची आवड आणि अभ्यास असलेल्या या दोघांच्या मार्गदर्शनाखाली होणारा हा हेरिटेज वॉक संग्रहालय बघण्याची नवी दृष्टी देईल.

कार्यक्रमाविषयी : पुण्यातील राजा केळकर संग्रहालय हेरिटेज वॉक
दिवस व वेळ : रविवार, ४ ऑगस्ट, सायंकाळी चार वाजता.

नावनोंदणीसाठी संपर्क : 
आशुतोष पोतनीस : ९८२२० ४९१०५
अश्विन चितळे : ८९७५९ ०९७२७  
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/MZELCC
Similar Posts
दिनदर्शिकेतून उलगडले ‘स्मरणरम्य पुणे’ राज्याची सांस्कृतिक राजधानी आणि ऐतिहासिक शहर असा नावलौकिक असलेल्या पुण्याच्या जुन्या आठवणी जागवणारी ‘स्मरणरम्य पुणे’ ही दिनदर्शिका नुकतीच प्रकाशित झाली आहे. विसाव्या शतकाच्या पूर्वार्धातील पुण्यातील काही महत्त्वपूर्ण घडामोडी, वाड्यांसारख्या वास्तूंचे सौंदर्य टिपणारी, तसेच महात्मा गांधी, इंदिरा गांधी, बॅ
भारताची प्राचीन ज्ञान-विज्ञान परंपरा डेक्कन कॉलेजचे (विद्यापीठ) कुलगुरू डॉ. वसंत शिंदे यांनी अलीकडेच केलेल्या संशोधनानुसार, आर्य बाहेरून आलेले नसून, ते इथलेच होते, हे ‘डीएनए’च्या अभ्यासावरून सिद्ध झाले आहे. याचा अर्थ, पुरातत्त्व आणि प्राचीन वाङ्‌मयाचा एकाच वेळी अभ्यास करण्याची गरज आहे. भारताची प्राचीन ज्ञान-विज्ञान परंपरा अतिशय अभिमानास्पद अशी आहे
संस्कृत भाषेच्या उन्नतीसाठी झटणारी पुण्यातील आनंदाश्रम संस्था उच्च न्यायालयात वकिली करणारे महादेव चिमणाजी आपटे यांनी ‘संस्कृतस्य उन्नत्यर्थमेव निर्मित:’ हे ध्येय समोर ठेवून पुण्यात १८८८मध्ये ‘आनंदाश्रम’ संस्थेची स्थापना केली. तेव्हापासून ही संस्था संस्कृतची उन्नती, प्रसार यांसाठी कार्यरत आहे. ‘किमया’ सदरात ज्येष्ठ लेखक रवींद्र गुर्जर आज लिहीत आहेत या संस्थेबद्दल
लोकमान्य टिळकांचा अग्रलेख – स्वदेशीवरील आक्षेप ‘भारतीय असंतोषाचे जनक’ या उपाधीने ओळखले जाणारे बाळ गंगाधर तथा लोकमान्य टिळक यांचे अग्रलेख ब्रिटिश सरकारला ठणकावून प्रश्न विचारत असत आणि भारतीयांचे प्रबोधनही करत असत. सध्या करोनाच्या प्रादुर्भावानंतर भारतात स्वदेशी चळवळीला पुन्हा चालना मिळाली आहे. पंतप्रधानांनीही आत्मनिर्भरतेचा नारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर,

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language